6 वाळू तस्करांवर गुन्हा दाखल; एकावर दंडात्मक कारवाई

1 hour ago 1

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहि्त्य आणि अटक करण्यात आलेले आरोपीPudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

10 Oct 2024, 1:28 pm

Updated on

10 Oct 2024, 1:28 pm

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक आणि दवनीवाडा पोलिसांनी ९ व १० ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत सहा वाळू तस्करांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एका आरोपीच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ५ ट्रॅक्टर व २ टिप्परसह ६७.९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौण खनिज रेती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी ट्रक्टर चालक पलास राधेशाम ठाकरे (वय २५ ), आशिष ईश्वरीलाल चौधरी ( वय २६ ), ओमप्रकाश ईश्वरीलाल चौधरी (वय २५ ), मनीष दिनदयाल पटले ( वय २५ ) सर्व राहणार अर्जुनी ता. तिरोडा, जि. गोंदिया तर टीप्पर चालक आरोपी प्रविण अनिल कटनकार ( वय २५ रा. पाटीलटोला (मुंडीकोटा) ता. तिरोडा जि. गोंदिया), यशोराज दिलीप चनाप ( वय २२ रा. गराडा, ता. तिरोडा जि. गोंदिया) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आरोपी मनीष धनेद्र ठाकरे ( वय २२ रा. देवरी, ता. तिरोडा, जि. गोंदिया असे दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे, यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरूध्द कारवाईचे कडक धोरण राबवले असून जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध कृती करणाऱ्यांवर वचक बसावा जिल्ह्यात विषेशतः अवैध गौण खनिज, रेती चोरी करणाऱ्याविरूध्द प्रभावी धाड कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील अट्टल सराईत गुन्हेगारांविरूद्ध तसेच अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्यांविरूध्द प्रभावी धाड कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार ९ ऑक्टोबर रोजी पहाटे व रात्रीच्या सुमारास तसेच १० ऑक्टोबर रोजी पहाटेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथक व दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध गौण खनिज रेती (वाळू ) चोरी करणाऱ्याविरूध्द वेगवेगळ्या ठिकाणी धाड कारवाई केली. ज्यामध्ये ५ आरोपी ट्रॅक्टर मध्ये तर दोन आरोपी टिप्परमध्ये विना परवाना अवैधरित्या रेतीची (गौण खनिज वाळू) चोरी करून वाहतूक करताना मिळून आले. यापैकी सहा आरोपींच्या विरोधात कलम ३०३(२),३(५) भा.न्याय संहिता अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तर एका आरोपीविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५ ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५ ब्रॉस रेती, तसेच २ टिप्परसह १२ ब्रास रेती असा एकूण ६७ लाख, ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article