Selu city Municipality: मुख्याधिकाऱ्यासह १६ कर्मचाऱ्यांची ये-जा; न प चा कारभार ढेपाळला

2 hours ago 1

मोहम्मद अय्युब यांनी केली तक्रार

परभणी/सेलू (Selu metropolis Municipality) : शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्यासह ९०टक्के कर्मचारी अर्थात १६ कर्मचारी बाहेरगावावरून रेल्वेने ये -जा करत असल्यामुळे संपूर्ण नगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असून वशिल्याशिवाय सर्वसामान्याचे कामच होत नसल्याने (Selu metropolis Municipality) पालिकेचा संपूर्ण कारभार ढेपाळला आहे. याबाबत शहरातील सामाजिक न्याय व विकास संघाचे निमंत्रक मोहम्मद आयुब अमिनोदिन यांनी लेखी तक्रार विभागीय आयुक्त औरंगाबाद ,जिल्हा अधिकारी परभणी यांच्यासह इतरांना एका निवेदनाद्वारे गुरुवार १० ऑक्टोबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्याधिकारी युवराज पौळ ,उपमुख्याधिकारी बी. एस. चव्हाण,अभियंता ज्ञानेश्वर जाधव, कर निरीक्षक उबेद चाऊस, आस्थापना प्रमुख नितीन इजाते, सहाय्यक रचनाकार अंबादास बळी, भांडार विभाग मुस्तजबा खान, लेखाविभागचे सर्वश्री शुभम धुत, जयकुमार काळे, अफसाना मुजावर, महेश कदम, गणेश सुरवसे, पाणीपुरवठाचे सचिन घुले, कार्यालयीन विभाग राघवेंद्र विश्वमित्र, स्वच्छता निरीक्षक विद्या सागर आणि ज्ञानेश्वर परसेवार तर स्वच्छता भारत अभियानचे कैलास कानपुरे आदी मुख्याधिकारी यांच्यासह १६ कर्मचारी परभणी, जालना, औरंगाबाद, मानवत, वसमत, पाथरी ,गंगाखेड आणि जिंतूर आधी ठिकाणाहून पालिकेचे ९०टक्के कर्मचारी ये- जा करत असतील तर शहरवासीयांचे काम कसे करत असतील हाच मुळात मोठा प्रश्न आहे. याच कारणामुळे (Selu metropolis Municipality) पालिकेच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणावर कारभार ढेपळला आहे. लोकांच्या पालिकेतील होत नसलेल्या कामा प्रमाणेच शहरातील राजीव गांधी नगर मधील नवीन पाईपलाईनच्या एक महिन्यापासून रखडलेल्या कामामुळे परिसरातील लोक पाणी पाणी करत आहेत. तीच अवस्था महाविद्यालय रोडची आहे.

या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे देखभाल करणारे अभियंता सचिन घुले त्यांच्या येजा करण्यातून वेळच मिळत नसल्याने या कामाकडे फिरकत देखील नाहीत. बाहेर गावाहून ये-जा करणारे संवर्गातील (केडर) कर्मचारी आहेत.परंतु ते स्वतःला क्लास वन अधिकारी समजतात. शिवाय मागील पाच वर्षापासून बायोमेट्रिक थम मशीन बंद ठेवून पालिकेने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एवढेच नाही तर आपण क्लासवन अधिकारी समजत असल्यामुळे तहसीलचे बीएलओच्या कामात स्वतःची नियुक्तीपत्र न देता स्थानिक सफाई कर्मचारी व सेवक यांचे तहसीलदार यांना त्यांचे नियुक्तीपत्र देऊन सफाई कर्मचारी व सेवक यांची बी एलओ म्हणून ९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व प्रकाराची तात्काळ दखल घेऊन ढेपाळलेल्या पालिकेचा कारभार वाटेवर न आणल्यास (Selu metropolis Municipality) पालिकेच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा करण्याचा इशारा आयुब अमीनुद्दीन यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article