ओला स्कूटरच्या सर्विसचे बिल 90 हजार झाल्याचे ऐकून एका संतप्त तरुणाने चक्क हातोडी घेऊन शोरुम बाहेरच स्कूटीची तोडफोड आहे. त्यात तो प्रचंड निराश दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक ग्राहक शोरुमच्या बाहेर हातोडीने स्कूटीची तोडफोड करताना दिसत आहे. ही घटना तेव्हा झाली जेव्हा सर्विस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या हातात 90 हजाराचे बिल थोपवले. व्हायरल व्हिडीओत पांढऱ्या रंगाचे टीशर्ट घातलेल्या एका व्यक्तीने शोरुमच्या समोर ठेवलेल्या स्कूटरवर हातोडा मारायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी एक व्यक्ती येतो आणि हातोडीने स्कूटर फोडतो. हा व्हिडीओ सध्या एक्सवर शेअर करण्यात आला आहे आणि त्यात शोरुमने 90 हजाराचे बिल केल्याने संतप्त ग्राहकाने त्रस्त होऊन शोरुमबाहेरच स्कूटर तोडले.
याआधी कॉमेडीयन कुणाल कामरा याने ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांची ग्राहक सेवा चांगली नसल्याची टीका केली होती. कामरा यांनी ओला स्कूटीच्या खरेदीनंतर त्याच्या सर्विस कॉलिटीबाबत प्रश्न केले होते.