उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या लाचखोरीच्या आरोपांवरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. अदानींना अटक करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. संसदेच्या आवारात राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सरकार अदानींना पाठिशी घालत असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
VIDEO | “Do you think Adani is going to accept the charges? Obviously, he is going to deny the charges. The point is he has to be arrested. As we have said, hundreds of people are being arrested on tiny charges, the gentleman has been indicted in the United States for thousands… pic.twitter.com/frMiHtBDsd
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2024
आपल्यावर झालेले आरोप अदानी स्वीकारतील असं वाटतं का? साहजिक आहे ते आरोप फेटाळणारच. मुद्दा हा आहे की त्यांना (अदानी) अटक झालीच पाहिजे. आम्ही आधीही ही मागणी केली आहे. छोटे आरोप असले तरीही अनेकांना अटक केली जाते. पण अदानींवर अमेरिकेत हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अदनींना तुरुंगात टाकलं पाहिजे. पण हे सरकार अदानींना वाचवतंय आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
अदानी समूहाच्या सात कंपन्यांना मूडीजचा लाल शेरा, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई, ग्रीन एनर्जीचा समावेश