आज गुरुवारी (दि.२१ नोव्हेंबर) सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद झाले. (file photo)
Published on
:
21 Nov 2024, 10:30 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:30 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समुहाच्या शेअर्समधील मोठ्या घसरणीचा फटका आज गुरुवारी भारतीय शेअर बाजाराला बसला. सेन्सेक्स आज ४२२ अंकांनी घसरून ७७,१५५ वर बंद झाला. तर निफ्टी १६८ अंकांच्या घसरणीसह २३,३४९ वर स्थिरावला.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोरी (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. याचे पडसाद आज गुरुवारी (दि.२१) शेअर बाजारात उमटले. अदानी समुहातील काही कंपन्यांचे शेअर्स आज २० टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे अदानींच्या शेअर्सचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी होऊन १२ लाख कोटींवर आले.
क्षेत्रीय निर्देशांकातील एनर्जी, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, पीएसयू बँक, मीडिया, ऑटो, मेटल १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर रियल्टी निर्देशांक १ टक्के आणि आयटी निर्देशांक ०.५ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्के घसरला.