महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे. Pudhari Photo
Published on
:
21 Nov 2024, 1:24 pm
Updated on
:
21 Nov 2024, 1:24 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. महायुतीला पुन्हा जनता कौल देईल, असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तविला आहे. तर काही संस्थांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला आहे. संमिश्र अंदाज आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्ता स्थापना करण्याचा दावा केला आहे. दरम्यान, आज (दि.२१) सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठक होत आहे. (Maharashtra Assembly Polls)
मुंबईतील ग्रँड हयात येथे बैठक सुरू असून यावेळी निकालानंतरच्या रणनितीची चर्चा होण्याची शक्यता आहे. हॉटेल पॉलिटिक्स होण्याची शक्यता असून या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, संजय राऊत, सतेज पाटील आदी नेते उपस्थित आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) असेल जनतेचा कल काँग्रेसकडे असून पक्षाचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ज्या पद्धतीने मतदानाचा ट्रेंड येत आहे, लोक ज्या पद्धतीने सांगत आहेत, त्यावरून राज्यात सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार यात शंका नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. (Maharashtra Assembly Polls)