Published on
:
24 Nov 2024, 12:12 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:12 am
नागपूर : जिल्ह्यातील 12 जागांचा विचार करता नागपूर शहरातील सहापैकी पुन्हा 4 जागा भाजप, तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. दक्षिण पश्चिमची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव करून पुन्हा जिंकली. फडणवीस यांची ही सहावी निवडणूक आहे.
दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे मोहन मते यांची काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या विरोधात विजयी घोडदौड सुरू आहे. पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे चौथ्यांदा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपूर जिंकत काँग्रेसची लाज राखली. उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माजी आमदार भाजपचे डॉ. मिलिंद माने यांचा पराभव केला. कामठीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे सुरेश भोयर यांना पराभूत केले. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा पराभव करीत भाजपचे चरण सिंग ठाकूर, सावनेरमध्ये भाजपचे आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना पराभूत केले. रामटेक मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा पराभव केला.
यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथे संजय दुलीचंद राठोड (महायुती) विजयी झाले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव गोविंदराव ठाकरे पुन्हा पराभूत झाले. पुसद मतदारसंघात महायुतीचे इंद्रनील मनोहर नाईक विजयी झाले. शरद मैद (महाविकास आघाडी पराभूत) उमरखेड येथे किसन मारोती वानखेडे (महायुती) विजयी झाले. महाविकास आघाडीचे साहेबराव दत्तराव कांबळे पराभूत झाले. आर्णीमध्ये राजू तोडसाम (महायुती) विजयी झाले असून काँग्रेसचे जितेंद्र शिवाजीराव मोघे पराभूत झाले. राळेगाव मतदारसंघात अशोक रामजी उईके (महायुती) विजयी झाले. दरम्यान, वणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देरकर विजयी झाले.चंद्रपूरात भाजपचे भांगडिया,भोंगळे, जोरगेवार विजयी, मुनगंटीवार, देवतळे, जोरगेवार आणि वडेट्टीवारांची आघाडी घेतली आहे.
वर्धा जिल्ह्यात चारही जागा महायुतीला
वर्धा जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात महायुती, भाजपच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. वर्धा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार पंकज भोयर, देवळी मतदार संघातून राजेश बकाणे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, आर्वी मतदारसंघात भाजपचे सुमीत वानखेडे विजयी झाले.