नांदेड पोटनिवडणुकीत, विजयी जल्लोषानंतर भाजप पराभूत:काँग्रेसचे उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण अवघ्या 1457 मतांनी विजयी

2 hours ago 1
लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत शेवटपर्यंत आघाडीवर असलेले भाजपचे डॉ. संतुकराव हंबर्डे यांना पराभवाचा झटका बसला. मतांच्या पुनर्मोजणीत काँग्रेसचे उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा अवघ्या १४५७ मतांनी त्यांचा पराभव केला. प्रा.रवींद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८, तर हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मते पडली. शनिवारी रात्री उशिरा प्रा.चव्हाण यांना प्रशासनाने विजयी घोषित केले. मतमोजणीदरम्यान एकीकडे महायुतीत आनंदोत्सव सुरू झाला होता. अचानक पराभवाचे वृत्त धडकताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची निराशा झाली. नांदेडमध्ये महायुतीचे सर्व ९ आमदार निवडून आले. मात्र लोकसभेची जागा महायुतीने गमावली. काँग्रेसचे तत्कालीन खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांचे पुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. भावनिक लाटेचा कॉँग्रेसला फायदा होईल, असे चित्र होते. मात्र, भाजपच्या व्यूहरचनेने काँग्रेसला कडवी झुंड दिली. उलट भाजपचे डॉ.हंबर्डे सुरुवातीपासून आघाडीवर होते. २३ व्या फेरीपर्यंत त्यांच्याकडे मताधिक्य होते. भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, सायंकाळी पुनर्मोजणीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. पोस्टल मतांमुळे आघाडी डॉ.हंबर्डे यांच्याकडे ६५७ मतांची आघाडी होती. त्यांना विजयी घोषित करण्याची प्रशासनाने तयारी केली. त्याच वेळी प्रा.चव्हाण यांनी मतांच्या पुनर्मोजणीची मागणी केली. पोस्टल मतांसह इतर मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. त्यात प्रा.चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय झाल्याचे प्रशासनाने घोषित केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article