जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेतला:मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, संजय राऊतांचा हल्लाबोल
3 hours ago
1
विधानसभेचा निकाल आधीच ठरवला होता. पहिल्या दोन तासात बरोबरी चालली होती. या सर्वाला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी योग्य निर्णय दिले असता तर महाराष्ट्रातील आजचे चित्र वेगळे दिसले असते. चंद्रचूड यांचे नाव इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल, असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. आता कुणी, कुठेही, कशाही उड्या मारू शकेल. कारण धनंजय चंद्रचूड पक्षांतरासाठी दारे उघडे ठेवून गेले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, अशी टीका संजय राऊत यांनी केल आहे. जनतेच्या न्यायालयात सुद्धा न्याय विकत घेण्यात आला. याबाबत आम्हाला वाईट वाटले, पण आम्ही निराश नाही. आम्ही लढाई अर्धवट सोडणार नाही. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका ठरली आहे. त्यांनी घरोघरी जाऊन विषारी प्रचार केला, असे राऊत म्हणाले. ही बातमी अपडेट करत आहोत...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)