दिव्य मराठी विश्लेषण:तुमच्या मनातील या पाच प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

2 hours ago 1
जिल्ह्यात ग्रामीण भागातील कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, पैठण व गंगापूर मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली असल्यचे चित्र दिसून आले. लोकसभेत चांगला निकाल असताना विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. फुलंब्रीत नियोजन शुन्य कारभारातून काँग्रेसने विलास औताडे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. वैजापूरात डॉ. दिनेश परदेशी यांनी निवडणूकीच्या महिनाभर आधीच ठाकरे गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. पैठणमधूनही दिग्गज असलेल्या भुमरेंच्या विरोधात पक्ष बदल करत दत्तात्रय गोर्डे यांनी उमेदवारी मिळवली. त्या उलट फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. गतपंचवार्षिकला हरीभाऊ बागडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, यंदा बागडेंनीच त्यांना उमेदवारी मिळवून दिली. तर वैजापूरात प्रा. रमेश बोरनारे यांच्या तुलनेत डॉ. परदेशी हे केवळ पालिका क्षेत्रापुरते मार्यादीत असल्याची चर्चा होती. तर याउलट बोरनारे यांनी तालुक्यासाठी मोठा निधी आणून ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क जपल्याने विजय झाला. पैठणमध्ये देखील भुमरेंची कामे त्यात वर्षभरापासून तयारी यामुळे विजयाची माळ अपसूकच त्यांच्या गळयात पडली. अनेक भागात इच्छुकांनी महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी महाविकास आघाडीत प्रवेश करून उमेदवारी घेतली खरी मात्र कोणत्याही फॅक्टरचा त्यांना उपयोग झाला नाही. त्याउलट महायुतीत प्रत्येक उमेदवाराने वर्ष किंवा दोन वर्षांपासूनच काम सुरू केली होते. त्यात लाडकी बहिण, कापूस व सोयाबीनला हभीभाव मुद्दे प्रभावी ठरले. जरांगे फॅक्टरवरच होती मदार सरकार म्हणजे महायुतीच्या विरोधात जरांगे पाटील असल्याचे बोलले जात होते. त्याचा प्रत्यय जालना लोकसभेत दिसून आला. मात्र, जरांगे पाटलांची बदलती भुमिकेचा फायदा थेट महायुतीलाच झाल्याचे दिसून आले. तर महाविकास आघाडीने कोणताही ठोस अजेंडा घेऊन मतदारांसमोर आलेच नाही. युतीच्या योजनांचे सुधारीत अपडेट करत योजना जाहीर केल्याने यंदा विधानसभेत लाडकी बहीण शिवाय कोणताही फॅक्टर चालला नाही. उद्धव ठाकरेंचा प्रभाव शिंदेसेनेपेक्षा कमी कसा? यंदाच्या निवडणूकीत जातीपाती, विविध लाभाच्या योजना यामुळे कोण मतदार कुणाकडे वळतात याची उत्सुकता लागून होती. तर मुख्यमंत्री शिंदे यांचे जनतेसाठी रात्रंदिवस काम करणे प्रेरणादयी ठरल्यानेच शिंदेसेनेने बाजी मारली. मुख्यमंत्री शिंदेंच्या अखंड कामाचा हा विजय आहे का? बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यावर यंदा मतदारांनी भर देत जिल्ह्यातील तिन्ही भाजपच्या उमेदवारांना विजयी केले. योजना व भाजपच्या प्रभावी नाऱ्याचा ग्रामीण भागातील जनतेत खोलवर रुजल्याचे दिसले. त्याचेच रुपांतर विजयात झाले. बटेंगेंच्या नाऱ्यामुळे भाजपचा विजय झाला का? निवडणूकांच्या पूर्वी जरांगे फॅक्टर व ओबीसी यातील संघर्षामुळे निवडणूक चुरशीची होणार असे चित्र होते. परंतू मतदारांनी जातीपातीच्या राजकारणापलिकडे जाऊन कामे करणाऱ्या सरकारलाच पुन्हा पसंती देत मोठ्या मताधिक्याने विजयी केले. जाती- पातीचे राजकारण का रुजले नाही ग्रामीण भागात? लोकसभा निवडणूकीत सर्वाधिक जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसून आला. याचा परिणाम कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी थेट नवीन फंडा वापरत लाडकी बहीण, कृषी मालाला हमी भाव व इतर प्रभावी योजना आणून महिलांची मने जिंकल्याने फॅक्टर ओसरला . जरांगे फॅक्टर जिल्ह्यात का चालला नाही? ठाकरे व शिंदे वेगळे झाल्यानंतर लोकसभेत शिंदेसेनेचे भुमरे विजयी झाले. मात्र सहानुभूती ठाकरे गटाकडे दिसून आली. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आपल्या आमदारांच्या मतदारसंघात मोठा निधी व योजना राबवून मतदारांना आकर्षित केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article