देवळाली कॅम्प: महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर देवळाली कॅम्प शहरात भाजप व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला
येथील जुने बस स्टँड परिसरात भाजपचे जिल्हा नेते व त्यांचा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, भगवान कटारिया, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, रिपाइंचे प्रदेश नेते भाऊसाहेब धिवरे, डॉ. संतोष कटारे, सिद्धार्थ पगारे ,गौतम पगारे, आर. डी. जाधव, अशोक साळवे, गौतम भालेराव, पंडित साळवे, राजू जाधव, भाजप महिला आघाडीच्या छाया हाबडे, सुरेखा कुलथे, युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश बंगाली, देवीदास गोडसे, सतीश कांडेकर, सतीश पाटील आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेश घोलप यांची राजकीय निवृत्तीची घोषणा?
पराभव मान्य करतानाच योगेश घोलप यांनी समाजमाध्यमांवर राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. याबाबत त्यांचे वडील बबनराव घोलप यांना विचारले असता योगेश घोलप यांनी निवृत्तीविषयीची पोस्ट टाकल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच ही पोस्ट डिलिट करण्यात आली. योगेश घोलप यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.