सिल्लोडसाठी उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागूनही त्यांना यश नाही:आत्मपरिक्षण करण्यासाठी त्यांना आत्माच राहिला नाही- अब्दुल सत्तार

2 hours ago 1
उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे भीक मागूनही त्यांना यश आले नाही. माझ्या मतदारसंघात त्यांनी केविलवाणी अव्सथा झाली होती. उद्धव ठाकरे यांचा आत्मपरिक्षण करण्यासाठी आत्माच राहिला नाही, असा टोला अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत मी केलेल्या राजकारण एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांवर माझ्या मतदारसंघात इतकी वाईट वेळ कधीच आली नव्हती, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण दिल्लीमध्ये भाजपचे श्रेष्टी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. सत्तारांचा विजयी चौकार,बनकरांचा निसटता पराभव सिल्लोड विधानसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत, शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली. अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा विजयाचा चौकार मारला असून या अटीतटीच्या लढतीत त्यांनी 2420 मतांनी विजय संपादन केला. सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी आठ वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या इमारतीत सुरुवात झाली. सोयगाव तालुक्यातील गावांपासून मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या पाच फेऱ्यांपर्यंत महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर अजिंठा येथील मतमोजणी सुरू झाल्यावर विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी चौदाव्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. यानंतर उंडणगाव पालोद गटाच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यावर सुरेश बनकर यांनी पुन्हा आघाडी घेण्यास सुरुवात केली बनकर यांनी 24 व्या फेरीपर्यंत 3589 मतांची आघाडी घेतलेली होती. उमेदवारी रद्द करण्याची मागणी 2019 विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. यासंदर्भात देखील सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात देखील न्यायालयाने साताऱ्यांना समन्स बजावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. असे असताना सत्तार यांनी पुन्हा एकदा खोटे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article