Published on
:
24 Nov 2024, 7:37 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:37 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने 37 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, दुसऱ्या डावात तो फेल गेला. यादरम्यान, त्याने आपल्या दमदार यष्टीरक्षणाने अनोखे शतक झळकावले आहे. त्याने अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला करता आलेली नाही.
ऋषभ पंत गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याची गणना सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षकांमध्ये केली जाते. मैदानावरील त्याची चपळता दिसून येते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने विकेटच्या मागे ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांचे झेल घेतले. यासह त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 100 विकेट्स (झेल आणि स्टंपिंग) पूर्ण केल्या.
ऋषभ पंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 100 विकेट्स घेणारा तिसरा यष्टिरक्षक ठरला आहे. त्याने WTC मध्ये आतापर्यंत 87 झेल घेतले असून 13 स्टंपिंग केले आहेत. त्याच्या आधी ॲलेक्स कॅरी (137 विकेट्स) आणि जोशुआ दा सिल्वा (108) यांनी अशी कामगिरी केली आहे.
WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टिरक्षक :
ॲलेक्स कॅरी : 137 (125 झेल, 12 स्टंपिंग)
जोशुआ दा सिल्वा : 108 (103 झेल, 5 स्टंपिंग)
ऋषभ पंत : 100 (87 झेल, 13 स्टंपिंग)
टॉम ब्लंडेल : 90 (78 झेल, 12 स्टंपिंग)
मोहम्मद रिझवान : 87 (80 झेल, 7 स्टंपिंग)
ऋषभ पंतने 2018 साली भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. यानंतर, त्याने 39 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2730 धावा फटकावल्या आहेत. यात 6 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.