A R Rahman Saira Banu Divorce: गेल्या काही दिवसांपासून भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रेहमान आणि पत्नी सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ए आर रेहमान यांनी खुद्द सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोट होणार असल्याची माहिती दिली. त्यांच्या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. दरम्यान, रंगणाऱ्या चर्चांबद्दल ए आर रेहमान यांनी सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रेहमान यांनी एक्सवर एका लीगल नोटीस जारी केली आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे लिगल नोटीस?
ए आर रेहमान यांनी एक लीगल नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, त्यांच्या लग्न आणि घटस्फोटाबद्दल करण्यात आलेल्या आपत्तीजनक पोस्ट डीलिट करण्याच याव्यात, नाहीतर, पोस्ट करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्यात येईल…
हे सुद्धा वाचा
“We had hoped to scope the expansive thirty, but each things, it seems, transportation an unseen end. Even the throne of God mightiness tremble astatine the value of breached hearts. Yet, successful this shattering, we question meaning, though the pieces whitethorn not find their spot again. To our friends, convey you for…
— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024
वकिलांकडून पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘माझ्या क्लायंटने लग्नाला तीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एक्सच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली होती. यामागे मानसिक तणाव असल्याचं सांगण्यात आलं…’
Notice to each slanderers from ARR’s Legal Team. pic.twitter.com/Nq3Eq6Su2x
— A.R.Rahman (@arrahman) November 23, 2024
‘काही युट्यूबर्स आणि काही माध्यमांनी घटस्फोटाच्या बातमाच्या स्वतःच्या पद्धतीत मांडल्या. स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी अनेक खोट्या गोष्टी प्रसारित केल्या. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही… ज्यामुळे ए आर रेहमान यांची प्रतिमा खराब होत आहे.’ असं पोस्ट म्हणण्यात आलंय.
पुढच्या 24 तासांत काय होणार?
‘पुढच्या 24 तसांत कंटेंट डीलिट करा… नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल… अशी चेतावनी देखील देण्यात आली आहे…’ रेहमान यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान यांच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.