परभणीत आघाडीला अतिआत्मविश्वास नडला:3 ठिकाणी महायुती, एका जागेवर आघाडीला यश
2 hours ago
1
जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. लोकसभेत मतदारांनी महाविकास आघाडीकडे झुकते माप दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अतिआत्मविश्वास नडला. मतदारांना वळवण्यात मविआ अपयशी ठरले. जिंतूर विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. त्यांच्या विजयामागे महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी तसेच मतदार क्षेत्रात केलेल्या कामाचा परिणाम दिसला. तसेच अमित शाह व पंकजा मुंडे यांच्या सभांमुळे त्यांचा मार्ग सोपा झाला. अटीतटीचा सामना या मतदार क्षेत्रात पाहायला मिळाला. तसेच काँग्रेसचे नेते व नाराजीमुळे वंचितकडून उमेदवारी मिळवलेले सुरेश नागरे यांना पराभव पत्कारावा लागला. पाथरीत चुरशीची लढत पाथरी मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला. गंगाखेडला शेवटच्या ४ फेऱ्यांत फिरला निकाल गंगाखेडला रासपचे रत्नाकर गुट्टे हे विजयी झाले. त्यांच्या विजयामागे मतदारसंघावर त्यांची असलेली पकड त्यांची कामे, साखर कारखान्यामुळे शेतकरी वर्गाशी असलेला संपर्क कामी आला. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विशाल कदम होते. मतमोजणीत प्रारंभी कदम आघाडीवर होते. परंतु शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर गेले. तसेच वंचितचे उमेदवार सीताराम घनदाट यांनादेखील पराभव स्वीकारावा लागला. परभणीत डॉ.पाटील यांची हॅट््ट्रिक परभणीत ठाकरे गटाचे डॉ. राहुल पाटील विजयी झाले, त्यांनी या वेळी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांच्या विजयामागे परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाल्यावरही एकनिष्ठ आमदार म्हणून ओळख निर्माण केली. मतदारसंघात त्यांनी केलेली कामे, प्रचंड मोठा जनसंपर्क आणि तरुणांमध्ये असणारी त्यांची क्रेझ या सर्व गोष्टींमुळे त्यांचा विजय झाला. याउलट भाजपचे बंडखोर आनंद भरोसे यांनी शिंदेसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)