बाळासाहेबांचा गड शिंदेसेनेने राखला:विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, मुस्लिम नाही एक, युती झाली सेफ
3 hours ago
1
मुस्लिम मतांमध्ये विभाजन झाल्यामुळे पूर्व आणि मध्य मतदारसंघात महायुतीने ‘आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन’वर (एमआयएम) मात केली. पूर्व मतदारसंघात माजी खासदार इम्तियाज जलील यांचा २,१६१ मतांनी, तर मध्य मतदारसंघात एमआयएमचे नासेर सिद्दिकी यांचा ८,११९ मतांनी पराभव झाला. दोन्ही मतदारसंघात अन्य मुस्लिम मतदारांनी विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली. मुस्लिम मतदानातील विभागणी महायुतीच्या पथ्यावर पडली. पूर्व मतदारसंघात भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी इम्तियाज जलील यांचा २,१६१ मतांनी पराभव केला. सावे यांना ९३,२७३, तर इम्तियाज यांना ९१,११३ मते मिळाली. इम्तियाज यांच्याशिवाय १४ मुस्लिम उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांनी १५ हजार २५० मते घेतले. चौथ्या क्रमांकावरील बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी ६,५०७ मते घेतली. समाजवादी पार्टीकडून रिंगणात उतरलेले डाॅ. गफ्फार कादरी ५,९४३ मते घेऊन चौथ्या स्थानावर राहिले. इतर मुस्लिम उमेदवारांनी घेतलेली मते तुलनेत कमी आहेत. ‘मध्य’मध्येही एमआयएमला फटका मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना ८५, ४५९ तर, एमआयएमचे नासेर सिद्दिकी यांना ७७,३४० मते मिळाली. सिद्दिकी यांच्याशिवाय ८ उमेदवार रिंगणात होते. त्यांनी १४ हजार ६५६ मते घेतली. त्यांनी घेतलेली मते जैस्वाल यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहेत. ‘वंचित’च्या जावेद कुरेशी यांनी १२ हजार ६३९ मते घेतली. ‘मध्य’मध्ये २०१४ची पुनरावृत्ती टळली मध्य मतदारसंघात २०१४मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा १९,९८२ मतांनी पराभव केला होता. त्या वेळी जैस्वाल यांना ४१,८६१ मते, तर भाजपचे किशनचंद तनवाणी यांना ४०,७७० मते मिळाली होती. हिंदू मतांच्या विभाजनामुळे एमआयएमचा विजय झाला होता. ती पुनरावृत्ती या वेळी टळली. विभागणीमुळेच तनवाणी रिंगणाबाहेर हिंदू मतांमध्ये विभागणी होईल आणि २०१४ प्रमाणे एमआयएमचा विजय होईल, या शक्यतेमुळे उद्धवसेनेचे किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे उद्धवसेनेने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिली. उद्धवसेनेचे नवे उमेदवार थोरात यांना मतदारांनी भरभरून मतदान केले नाही. उद्धवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धवसेनेचा आता एकही आमदार नसेल. २०१९च्या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार होते. पक्षातील फुटीनंतर ५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. कन्नडमधील उदयसिंह राजपूत उद्धवसेनेत राहिले होते. त्यांचा कन्नड मतदारसंघात पराभव झाला. शिंदेसेनेच्या विरोधात पैठण, मध्य, पश्चिम, वैजापूर व सिल्लोडमध्ये उद्धवसेनेला हार स्वीकारावी लागली. विशेष म्हणजे शिंदेसेनेतील सर्व आमदार विजयी झाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)