सिल्लोड विधानसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत, शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली. अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा विजयाचा चौकार मारला. या अटीतटीच्या लढतीत त्यांनी २४२० मतांनी विजय मिळवला. बनकर यांनी सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. तर तिसऱ्या ते दहाव्या फेरीपर्यंत अब्दुल सत्तार आघाडीवर होते. त्यानंतर अकराव्या फेरीपासून बनकर यांनी आघाडी घेतली. ११ ते १७व्या फेरीपर्यंत बनकर यांची आघाडी कायम होती. पुन्हा १८व्या फेरीत सत्तार, तर १९व्या बनकर पुढे गेले. यानंतर उंडणगाव पालोद गटाच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यावर सुरेश बनकर यांनी पुन्हा आघाडी घेण्यास सुरुवात केली. बनकर यांनी २४ व्या फेरीपर्यंत ३५८९ मतांची आघाडी घेतलेली होती.
१० फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. अखेर २५ व्या फेरीला सिल्लोड शहराची मतमोजणी सुरू झाल्यावर अब्दुल सत्तार यांनी मोठ्या फरकाने मतांची आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा २७ आणि २८ या दोन फेऱ्यांमध्ये बनकर यांनी आघाडी कमी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सत्तार यांना विजयी घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु असताना, बनकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. त्यानंतर उडालेल्या गोंधळात तीन तास उपस्थितांना प्रतीक्षा करावी लागली. या काळात मतमोजणी केंद्रावर काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारानंतर चर्चा केली. तसेच सत्तार यांच्यासह बनकर यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून, निकाल घोषीत केला. मतमोजणी पूर्ण झाल्यावरही निकाल राखीव सिल्लोडला मतमोजणी ४ वाजता पूर्ण झाली होती. या प्रक्रियेदरम्यान सुरेश बनकर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ७.३० वाजेपर्यंत त्यावर प्रशासनाने निकाल राखीव ठेवला. बनकर यांनी दिलेला पुनर्मोजणीचा अर्ज नामंजूर करत, रात्री ८ वाजता सत्तार यांना विजयी घोषीत केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)