नेत्याचा पराभव लागला जिव्हारी:दोन कार्यकर्त्यांनी केले विष प्राशन, टोकाचे पाऊल न उचलण्याचे हर्षवर्धन पाटलांचे आवाहन
3 hours ago
1
विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने दोन कार्यकर्त्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. एकावर कन्नड येथे तर दुसऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पिच्चर बहोत सारा बाकी है, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे ही घटना घडली. सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव असे विष प्राशन केलेल्या दोघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकावर कन्नड येथे उपचार सुरू असून दुसऱ्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दादा पडायला नाही पाहिजे होता, आता आम्ही काय करु म्हणत त्यांनी हा जीवघेणा मार्ग पत्करल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. कुणीही असे पाऊल उचलू नये, हर्षवर्धन पाटलांची विनंती
मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो, कृपया कुणीही असे कोणतेही पाऊल उचलू नका. कारण अभी पिच्चर बहोत सारा बाकी आहे. सगळे संपले आहे, असे समजू नका. अजून सुरुवात देखील झालेली नाही. मला स्वत:ला विकावे लागले तरी विकेन, पण तुमच्या आशा आकांक्षांना वाया जाऊ देणार असा शब्द देतो. आत्महत्येचा प्रयत्न, विष पिणे असे प्रकार करू नका. मतदारसंघात आपणच राजे आहोत. मला विकावे लागले तरी चालेल पण तुम्हाला ईजा होऊ देणार नाही, असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून तरुणांना विनंती केली आहे. कन्नडच्या मैदानात पत्नीची पतीवर मात, संजना जाधव विजयी
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढतीमुळे कन्नड विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला होता. संजना जाधव यांनी आपल्या पतीचा 18 हजार 201 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कन्नड विधानसभा मतदार संघातील ही लढत पक्षीय चढाओढीपेक्षा पती-पत्नी आणि सासरे यांच्या वादामुळे आणखी रंगतदार झाली होती. संजना जाधव यांना 84 हजार 492 तर हर्षवर्धन जाधव यांना 66 हजार 291 मते पडली. ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत यांना 46 हजार 510 मते मिळाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)