राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता नुकतंच राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे.
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता नुकतंच राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे