काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल.File Photo
Published on
:
24 Nov 2024, 7:44 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. २८८ जागांपैकी तब्बल २३० जागांवर महायुतीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही मोठ्या पराभवाचा सामना करावालाग आहे. आता या निकालावर विरोधी पक्षांकडून भाष्य होत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी निकालानंतर पक्षाची भूमिका मांडली. (Maharashtra Assembly Results)
निकाल धक्कादायक आणि अविश्वसनीय
एका वृत्तवाहिनीशी बोलताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आणि अविश्वसनीय आहेत. काय घडले ते आम्हाला समजत नाही. हा केवळ काँग्रेस पक्षाचा पराभव नव्हता तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव होता." (Maharashtra Assembly Results)
केवळ काँग्रेस पक्षाचेच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे अपयश
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बालेकिल्ल्यात आम्हाला मोठा धक्का बसला. हे केवळ काँग्रेस पक्षाचेच नाही तर संपूर्ण आघाडीचे अपयश आहे. आता आम्ही एकत्र बसून आत्मपरीक्षण करू, असेही वेणुगोपाल यांनी नमूद केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२, शिवसेना शिंदे गट ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडातील राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार १०, काँग्रेसला १६तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २० जागा जिंकल्या.