बरबडीत अखाड्याला लागलेल्या आगीत शेळ्यांसह म्हशींचा होरपळून मृत्यूFile Photo
Published on
:
24 Nov 2024, 10:13 am
Updated on
:
24 Nov 2024, 10:13 am
पूर्णा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बरबडी येथील पांगरा-पूर्णा रोडवर असलेल्या बरबडी हनुमान मंदिरापासून जवळच असलेल्या गट क्रमांक ९५ मधील शेतशिवारातील अखाड्याला आज (रविवार) दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या लोळाने झोपडीत बांधलेल्या दोन मोठ्या शेळ्या, चार म्हशी, वघारे जळून होरपळ्यामुळे मृत्यू पावले. तर ईतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सबंधित शेतकरी विलास मारोतराव सोलव, रामचंद्र मारोतराव सोलव यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाकडू नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, बरबडी येथील शेतकरी विलास, रामचंद्र मारोतराव सोलव यांच्या मातोश्री कोंडाबाई सोलव (वय ७५ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने ता.२३ नोव्हेंबर (शनिवार) रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले होते. त्यामुळे सदर शेतकरी गावाकडे होते. त्यामुळे शेतातील अखाड्यावर कोणीही नव्हते. यातच २४ नोव्हेंबर रोजी दुपारी आईचा अंत्यविधी उरकताच आखाडा जळून जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे शेतकरी सोलव यांच्यावर दुहेरी दु:ख ओढावले गेल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.