‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरात सर्वात जर चर्चा झाली असेल तर ती आऱ्या आणि निक्कीच्या वादाची अन् आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याची. त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आर्याला पाठिंबाही दर्शवला होता. या प्रसंगानंतर आर्याला घरातून निरोप घ्यावा लागला होता. त्यानंतर हे पुन्हा याबाबत चर्चा झाली नाही. आर्या आणि निक्कीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
‘बिग बॉस’ संपल्यानंतर पुन्हा एकदा निक्की आणि आर्यामधला वाद हा पेटताना दिसतोय. तोही एका व्हिडीओवरून आणि निक्कीने केलेल्या कमेंटमधून. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर आर्याने ‘बिग बॉस’च्या प्रवासावर एक रॅप लिहून आपलं मत मांडलं होतं. आर्याने शेअर केलेल्या रॅपवर “ही फुटेज खातेय” असा आरोप निक्कीच्या एका फॅनपेजने केला होता. हीच इन्स्टाग्राम स्टोरी निक्कीने रिशेअर करत त्यावर “एक मोटा हाथी…” हे गाणं लावलं. त्यामुळे हा वाद आता पुन्हा पेटला आहे.
निक्कीने केलेल्या या व्हिडीओवर आर्यानेही तिचा एक व्हिडीओ शेअर करत प्रतिउत्तर दिलं आहे. आर्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, “मला इन्स्टाग्रामवर एका मुलीचा मेसेज आला. त्यात असं लिहिलं होतं की, निक्कीची स्टोरी बघ. मी पाहिलं तेव्ह निक्कीने कोणाची तरी स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, आर्या अजूनही निक्कीच्या नावाने फुटेज खातेय. निक्की मॅडमने त्या पोस्टला “एक मोटा हाथी…” असं गाणं लावलं होतं. तू चांगलं फॅट शेमिंग करतेस निक्की… पण, प्लीज…मी पण एक रॅपर आहे. माझ्या लिखाणातून मी उत्तर देणार. तुम्हाला वाटतं ना मी गप्प राहावं मग मला उगाच भिडू नका. रॅप लिहिणं हे माझं काम आहे त्यामुळे मला जे वाटतं ते मी नक्कीच लिहिणार आणि त्यातून उत्तर देणार.”
आर्या पुढे म्हणाली “जर मला तुझ्या नावाने फुटेज हवं असतं… तर, मी घरात राहून जिंकून आले असते. तुला मारून घराच्या बाहेर नसते आले. तरीही आज लोक मला चांगलं बोलत आहेत. सगळे म्हणत होते अजून 4-5 पाच कानाखाली का नाही मारल्यास… त्यामुळे प्लीज Get Over Yourself… आली मोठी मला भिडायला. मुलाखतींमध्ये ही मुलगी माझ्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घाबरत होती. तिच मुलगी आता माझ्याबद्दल स्टोरीज टाकून फुटेज घेतेय…घे दिलं मी तुला फुटेज” असं रोखठोक मत आर्याने या स्टोरीजमधून मांडलं आहे.
असं म्हणत आर्याने निक्कीला थेट ताकीद दिल्याचे दिसून येत आहे. आता आर्याच्या या व्हिडीओवर निक्की काय उत्तर देणार आणि हा वाद शांत होणार की वाढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.