मिरज मतदारसंघातील मतपेट्या बदलल्याच्या अफवेमुळे गोंधळ निर्माण झाला.File Photo
Published on
:
21 Nov 2024, 4:43 pm
Updated on
:
21 Nov 2024, 4:43 pm
सांगली : जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राखीव मतपेट्या मिरजेत आणण्यात आल्या होत्या. या मतपेट्या आणणार असल्याची पूर्वकल्पना उमेदवारांना देण्यात आली नव्हती. सर्व उमेदवार यासंबंधित चौकशीसाठी मतपेटी ठेवलेल्या वेअर हाऊस मध्ये जमल्याने गोंधळ निर्माण झाला.
रिकाम्या मतपेट्या आल्या त्यावेळी वार रूम जवळील लाईट अर्धा तास गायब झाल्याचा आरोप यावेळी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारासह मोठा जमाव मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज तसेच मिरज विधानसभेच्या मतपेट्यात ठेवलेल्या वॉररूमचे सील दाखविण्याचे काम सुरू आहे. निवडणूक अधिकारी, पोलीस आणि ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.