Published on
:
21 Nov 2024, 4:30 pm
Updated on
:
21 Nov 2024, 4:30 pm
पुढारी ऑनलाईन डेस्कः शनिवारी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची घालमेल सुरु आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची मातोश्रीव बैठक झाली असून यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर काय राजकीय गणित असतील किंवा सत्ता गेली तर मग काय राजकीय गणित असतील. या बाबत सविस्तर आढावा घेण्यात आल्याची माहीती समोर येत आहे.
जर 23 तारखेच्या निकालाच्या दिवशी निकाल हा कटू कट आल्यावर महाविकास आघाडीच्या आमदार यांना कसे संभाळाचे, त्यांना कसे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळत आहे. जर निकाल मविआच्या बाजूने लागले तर तारखेच्या आत सत्ता स्थापन करायचीच यावर ठामपणे निर्णय झाला कसल्याचे कळत आहे.
आघाडीच्या नेत्यांनी सुरवातील हॉटेल ग्रांट हयात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर हे सर्व नेते मातोश्री पोहचले त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील व शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे दोघे सिल्वर ओक वर शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.