बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 22 ते 26 नोव्हेंबर पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह सलामीच्या सामन्यात कॅप्टन्सी करणार आहे. या सामन्याआधी 21 नोव्हेंबरला पत्रकार परिषद पार पडली. कॅप्टन बुमराहने या पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश केला जाणार का? असा प्रश्न करण्यात आला. बुमराहने या प्रश्नावर काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात.
बीसीसीआय निवड समिताने 25 ऑक्टोबरला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचही सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला नसल्याने त्याची निवड करण्यात आली नाही. शमीने त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून कमबॅक केलं. शमीने अप्रतिम कमबॅक केलं आणि बॉलिंगसह आणि बॅटिंगनेही आपली छाप सोडली. शमीने यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दावा ठोकला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना शमीची भारतीय संघात निवड, या बातमीची प्रतिाक्षा आहे. याच अनुषंगाने विचारलेल्या प्रशनावर बुमराहने दिलेलं उत्तर जाणून घेऊयात.
बुमराह काय म्हणाला?
“मोहम्मद शमी टीम इंडियाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे, त्याने कमबॅक केलंय. टीम मॅनेजमेंट नक्कीच शमी भाईच्या फिटनेसकडे लक्ष ठेवून असेल, अशी मला आशा आहे. जर सर्वकाही अपेक्षेनुसार घडलं तर शमी या दौऱ्यात खेळताना दिसेल”, अशी आशा बुमराहने व्यक्त केली.
बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसऱ्या सामना हा मोजून 10 दिवसांनंतर होणार आहे. त्यामुळे शमीचा संघात समावेश केल्यास तो 6 डिसेंबरपासून होणाऱ्या एडलेड कसोटीत खेळताना दिसू शकतो.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार) जसप्रीत बुमराह (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.