Adv. Rohini Khadse: रोहिणीताई खडसेंच्या हस्ते होणार भव्य बचतगट प्रदर्शनीचे उद्धाटन

2 hours ago 1

सुषमाताई अंधारे करणार प्रमुख मार्गदर्शन ; हेमलताताई भूषविणार अध्यक्षस्थान

बुलढाणा (Adv. Rohini Khadse) : दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने ४, ५ व ६ ऑक्टोंबर रोजी महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. येथील मलकापूर रोडवरील एआरडी सिटी मॉलच्या मागे, बुलडाणा रेसिडेन्सी समोरील मैदानात सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या (Disha Women’s Federation) बचतगट प्रदर्शनीचा उद्धाटन समारंभ होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांनी केले आहे.

या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रवादी महिल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे (Adv. Rohini Khadse) यांच्या हस्ते होणार आहे. (Disha Women’s Federation) कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलताताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमलताई झंवर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव स्वातीताई वाकेकर, मिनलताई आंबेकर, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने महिला उपस्थितीत राहणार आहेत.

२५० स्टॉल असणार उपलब्ध

बुलढाणा येथे आयोजित दोन दिवसीय (Disha Women’s Federation) बचतगट प्रदर्शनीत जवळपास २५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. खाद्यजत्रा, हस्तकला वस्तू हस्तशिल्प, घरगुती पदार्थ व मसाले, महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू, महिलांचा स्नेहमिलन सोहळा, महिलांचा आनंदोत्सव, महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बचटगट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

समाजप्रबोधनकार प्रविणज दवंडे यांचे किर्तन ठरणार आकर्षण

बचतगट प्रदर्शनीत दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. प्रसिद्ध समाज प्रबोधनकार पवन दवंडे यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या वाणीतून करणार आहेत. कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग, देश-समाजातील इतर समस्या, अधूनमधून विनोदाची पेरणी करत कीर्तनात सादर करत असतात. त्यांच्या कीर्तनाला महिला आणि तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असतो. सामाजिक जनजागृतीसाठी हा लोकोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच इतरही कार्यक्रम यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article