अनेक जिल्ह्यातील नवरात्र मंडळे घटस्थापना करण्याआधी भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुळजापुरात येतात. आज (बुधवारी) दिवसभर अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, संभाजीनगर, जळगाव, भुसावळ, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधून अनेक नवरात्र मंडळे भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुळजापुरात आले. त्यानंतर वाजत-गाजत तुळजाभवानी मंदिरामध्ये असणाऱ्या होमकुंड येथील दिव्याला आपली भवानी ज्योत प्रज्वलित करत आई राजा उदो उदो जयघोष केला. त्यानंतर ती भवानी ज्योत घेऊन ते पायी चालत तुळजापुरातून बाहेर पडले. सुमारे साडेचार हजार मंडळे भवानी ज्योत प्रज्वलित करून तुळजापुरातून दिवसभरात मार्गस्थ झाली. तुळजापूर येथे नवीन बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्याच दिवशी हा चिखल आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ
Related
ICC Womens T20 World Cup 2024 : पहिल्याच दिवशी डबल धमाका, 4 ...
29 minutes ago
0
येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण:उपमुख्य...
51 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT