कोपरगावात पिंडदान करून अनोखे आंदोलन:आमदार काळे यांच्या कारभाराचा केला निषेध

3 hours ago 1
तालुक्यातील हजारो कोटींच्या वल्गना मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने रस्त्यावर मुंडन करत युवकांनी हजारो कोटींचा निषेध व्यक्त केला. विद्यमान लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांच्या निष्क्रिय कारभारामुळे रस्ते महामार्ग यावर अनेक नागरिकांचे अपघातात प्राण गेले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोपरगाव मतदारसंघात रस्ते पाणी वीज रोजगार कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाले असून आमदारांचे साफ दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून अशा प्रकारचे अनोखे आंदोलन करून संताप व्यक्त होतो आहे. एका बाजूला हजारो कोटींच्या वल्गना दुसऱ्या बाजूला नागरिकांना मात्र लावला जातो चुना अशीच काहीशी अवस्था विकासाची झाली आहे. विकास कामांच्या गोंडस नावाखाली भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे.अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उंमटू लागली आहे. यावेळी विधिवत पित्र पूजा करून आमदार काळे यांच्या फसव्या तीन हजार कोटीचे पित्र घालण्यात आले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या हजारो समस्यांचा ठीक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. मालक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निखिल मिसाळ व विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र, क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन महाराष्ट्र आणि अनिल पगारे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी राजेंद्र टुमके यांनी आंदोलात केस अर्पण करून (मुंडण ) करून अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रमेश वायदंडे, आदित्य चव्हाण, मुकुल गायकवाड, अतिश पगारे, सोनू वाडेकर, प्रतीक पगारे, गौरव परदेशी, जय गायकवाड आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article