चिखलदरा, अचलपुरमधील भूकंपाचा अभ्यास सुरू:भूगर्भशास्त्रज्ञांचा चमू अमरावतीत

3 hours ago 1
चिखलदरा, अचलपुर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व काही प्रमाणात तिवसा तालुक्यात जाणवलेले भूकंपाचे धक्के अभ्यासण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची दोन सदस्यीय चमू उद्या, गुरुवार, ३ ऑक्टोबरपासून अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहे. या सर्व तालुक्यांत दोन दिवसांआधी ४.२ एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी चिखलदरा तालुक्यातील काही गावांतील जुन्या इमारतीच्या भिंतींना या भूकंपाचा हादरा बसला. त्यामुळे भिंतींना तडे जाऊन जर्जर झालेल्या इमारती नादुरुस्त झाल्या, असा अहवाल तेथील तहसीलदार जीवन मोरणकर यांनी पाठविला होता. या अहवालाच्या आधारे आणखी अभ्यास करुन भूकंपाची कारणे शोधण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची चमू त्या भागाला भेट देणार आहेत. आवश्यकता भासल्यास काही दिवस ही चमू तेथे थांबणारही आहे. नागपुर येथून आलेल्या या चमूच्या सदस्यांनी दोन दिवसाआधी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक माहिती दिली. शिवाय त्यांचे निर्देशही ऐकूण घेतले. त्याच निर्देशाच्या आधारे ही दोन सदस्यीय चमू उद्या, गुरुवारी चिखलदरा येथे पोचणार आहे. भूगर्भातील हालचालींमुळे झालेला भूकंप नेमका कशामुळे झाला, हे या चमूचे मुख्य लक्ष्य आहे. या भूकंपाचे केंद्र चिखलदरा नजिकचे आमझरी-टेटू आहे. हा भूकंप जमीनीच्या आत साडे एकोणवीस किलोमीटरवर झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे झाला, असे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. आजपासून प्रत्यक्ष काम चिखलदरा, अंजनगाव सुर्जी परिसरात झालेल्या भूकंपाची कारणमीमांसा करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची दोन सदस्यीय चमू उद्या, गुरुवारी अमरावतीत दाखल होईल. ही चमू थेट चिखलदरा येथे पोहोल्यानंतर भूकंपविषयक कारणांची मीमांसा करेल. येत्या काही दिवसांतच हे परीक्षण पूर्ण होणार असून त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे येणार आहे, असे अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article