सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्याची इलॉन मस्कला किती मिळणार पैसे ?

3 hours ago 1

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोअर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आणण्यासाठी एक मिशन आखले आहे. या मिशन क्रु-9 मिशन असे नाव दिले आहे. दोन्ही अंतराळवीर पाच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून आहेत. इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट रवाना झाले आहे. स्पेसक्राफ्ट सोबत नासाचे अंतराळवीर निग हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबनोव्ह देखील गेले आहेत. स्पेसक्राफ्टमध्ये एकूण चार आसने आहेत. दोन आसने सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोअर यांच्या साठी राखीव ठेवली आहेत.

फाल्कन 9 रॉकेट काय आहे ?

फाल्कन 9 रॉकेट एक टु वे रियुजेबल रॉकेट आहे. ज्याला इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने (SpaceX) पृथ्वीची कक्षा आणि त्याच्या पुढे जाण्यासाठी डिझाईन केले आहे. फाल्कन 9 जगातील पहिले रियजेबल ऑर्बिट क्लास रॉकेट आहे. या रॉकेट पुन्हा वापरता येते. त्यामुळे अंतराळ प्रवास पूर्वी पेक्षा स्वस्त झाला आहे. स्पेसएक्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार फाल्कन 9 रॉकेट 70 मीटर लांब असून त्याचे वजन 549,054 किलो आहे. हे रॉकेट पृथ्वीच्या आतील कक्षेत( leo ) 22,800 किलोपर्यंत वजन नेऊ शकते.

सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनला नेणारे ड्रॅगन स्पेशक्राफ्ट जगातील पहिले खाजगी स्पेसक्राफ्ट आहे. या स्पेसक्राफ्टला देखील इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सने बनवले आहे. ड्रॅगनचे एक वैशिष्ट्ये हे की हे अंतराळ स्थानकातून मोठ्या प्रमाणावर कार्गो देखील सोबत आणू शकते. ड्रॅगन स्पेसक्राफ्टला फाल्कन – 9 रॉकेटद्वारे लॉंच गेले जाते.

किती पैसे घेणार इलॉन मस्कची कंपनी

Syfy.com एका रिपोर्ट नुसार 2022 च्या आधी फाल्कन 9 रॉकेट लॉंचिंग साठी सुमारे 62 दशलक्ष डॉलरचा खर्च येत होता.इलॉन मस्कच्या कंपनीने साल 2022 मध्ये ही रक्कम वाढवून 67 दशलक्ष डॉलर केली आहे. रुपयात ही रक्कम सुमारे पावणे सहा अब्ज रुपयांच्या बरोबर आहे. जर फाल्कन रॉकेटसोबत जर स्पेसक्राफ्ट गेले तर खर्च 140 दशलक्ष डॉलर वर जातो. अंतराळवीर फाल्कन 9 द्वारे अंतराळ स्थानकात गेला आणि परत यायचे असले तरी रॉकेटचा संपूर्ण खर्च द्यावा लागतो. आसनानुसार ही बुकींग करावी लागली.

spacenews च्या अहवालानुसार स्पेस एक्स आणि रॉकेट लॅब सारख्या खाजगी कंपन्यामुळे अंतराळ प्रवास आता पहिल्या पेक्षा स्वस्त झाला आहे. अमेरिकेने पहिले अपोलो -11 मिशन 16 जुलै 1969 रोजी लॉंच केले तेव्हा एकूण 185 दशलक्ष डॉलर खर्च झाले होते. आजच्या काळात ही रक्कम 1.62 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यावेळेचे रॉकेट खूप कमी वजन घेऊन जायचे.

सुनीता विल्यम्स कशी अडकली

सुनीता विल्यम्स (Sunita williams) आणि बुश विल्मोअर 5 जून रोजी बोईंग कंपनीच्या स्पेसक्राफ्ट स्टारलायनर द्वारे अंतराळ स्थानकात गेले होते. त्यांना आठ दिवस तेथे मुक्काम करुन पुन्हा यायचे होते. परंतू स्पेसक्राफ्ट लॉंच केले तेव्हा चार जागी हेलियम वायू गळती झाली . तसेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनात डॉकिंग करताना याचे थ्रस्टर देखील फेल झाले होते. हेलियम गळती गंभीर समस्या होती त्याने आग लागण्याची देखील शक्यता होती. नासाच्या इंजिनियर या स्टारलायनरला दुरुस्त करीत राहीले. परंतू अखेर कोणतीही रिस्क नको म्हणून 6 सप्टेंबरला सुनीता यांना न घेता स्टारलायनर रिकामे पृथ्वीवर आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article