ठेवीदारांच्या ठेवी तातडीने अदा करा, अन्यथा आंदोलन करू:ठेवीदारांचा मलकापूर अर्बन बँकेला इशारा

2 hours ago 1
दि मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत हजारो ठेवीदारांच्या ६७५ कोटीहून अधिक ठेवी अडकल्या आहेत. त्या तातडीने अदा कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठेवीदरांनी दिला आहे. मागण्यांचे निवेदन पोलिस आयुक्त व विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. मलकापूर बँकेतील अनागोंदी कारभार उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. ठेवीदारांना केवळ १० हजार रुपये मिळत आहेत. तर ५ लाखांपर्यंतच्या ठेवी डीआयसीजीसीकडून दिल्या जात आहेत. ५ जुलै २०२४ रोजी रिझर्व्ह बँकेने मलकापूर बँकेचा परवाना रद्द केला आहे. पुणे सहकार आयुक्तांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार व्ही. के. लहाने यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या विरोधात बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी राजकीय ताकद वापरून आदेशावर स्थगिती मिळवली होती. मात्र, मंत्र्यांना स्थगिती देण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे हि स्थगितीचे अधिकार हायकोर्टाने रद्द केले आहेत. मात्र, बँक कोण चालवतय हेच ठेवीदारांना कळत नाही. दसरा दिवाळी जवळ आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी कधी मिळणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. घामाचे दाम अडकून पडल्यामुळे ते हैराण आहेत. याकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांनी पोलिस आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे मागणी केली आहे. अध्यक्ष व संचालक मंडळांवर कारवाई व्हावी मलकापूर बँकेचे अध्यक्ष भाजपचे आमदार व बढे नेते आहेत. त्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई होऊ देत नाहीत. दोषी संचालक मंडळांना पाठिशी घातले जात आहे. यामुळे ठेवीदार हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे आदर्श नागरी पतसंस्था, बँकेतील घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यात आली. ते कारागृहात आहेत. मालमत्ता विक्री व ठेवी परत करण्यात येत आहेत. तसे मलकापूर बँकेतील अध्यक्ष व संचालकांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उपस्थित केला असून ठेवीदारांच्या न्याय मागणीसाठी त्यांनी ठेवीदारांना पाठिंबा दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article