महावितरण कला व क्रीडा मंडळाच्या क्रीडा महोत्सवास प्रारंभ:12 संघांमध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू

2 hours ago 1
महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या कला व क्रीडा मंडळातर्फे आयोजित दोनदिवसीय क्रीडा महोत्सवास बुधवारी (2 ‍ऑक्टोबर) सकाळी थाटात सुरुवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अधीक्षक अभियंता संजय सरग, कला व क्रीडा मंडळाचे ‍सचिव विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, महेश पाटील, भूषण पहूरकर, रमेश वाघचौरे, मकरंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर महावितरणच्या विविध कार्यालयांच्या 12 संघांमध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या. यात सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांचा प्रदर्शनीय सामना झाला. यानंतर परिमंडल ‍विरुद्ध ग्रामीण मंडल यांच्यात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात ग्रामीण मंडलाने 8 धावांनी विजय मिळवला. ग्रामीण मंडलाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकांत 92 धावा केल्या. विजय मेटे यांनी 37 धावा केल्या. परिमंडलातर्फे पवनकुमार कछोट यांनी 2 बळी टिपले. प्रत्युतरात परिमंडलाचा संघ 84 धावांपर्यंत पोहचू शकला. पवनकुमार कछोट यांनी नाबाद 44 धावा काढल्या. अष्टपैलू कामगिरीसाठी कछोट यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ग्रामीण-1 विरुद्ध शहर-1 ‍विभाग यांच्यातील सामन्यात ग्रामीण-1 ने विजय मिळवला. तर शहर-2 विभागावर कन्नड विभागाने मात केली. परिमंडल परिसरात बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस व बुद्धिबळ या खेळांच्या वैयक्तिक लढती झाल्या. टेबल टे‍निसमध्ये महिला गटात अश्विनी मदने या विजेत्या ठरल्या. सारिका कोठाळे यांना उपविजेतेपद मिळाले. पुरुष गटात आशिष खानापुरे विजेते ठरले. रोहन श्रीरामवार यांना उपविजेतेपद मिळाले. बॅडमिंटनमध्ये महिला गटात वैशाली पवार विजेत्या ठरल्या. रत्ना ‍निसर्ग यांना उपविजेतेपद मिळाले. कॅरममध्ये महिला गटात वैशाली पवार यांना विजेतेपद तर सारिका मिटकरी यांना उपविजेतेपद मिळाले. 5 तारखेला स्पर्धेचा समारोप होईल.‍ जवळपास 500 कर्मचारी खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. आयोजन समितीचे सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article