Akhara Balapur Police: अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात वापरलेली थार जीप तेलंगणा येथून जप्त

2 hours ago 1

आखाडा बाळापूर पोलीस पथकाची कामगिरी

आखाडा बाळापूर/हिंगोली (Akhara Balapur Police) : आखाडा बाळापूर येथील व्यवसायीकाच्या अपहरण प्रकरणात वापरलेली थार जीप आज आखाडा बाळापूर पोलीस पथकाने तेलगांणा राज्यातील हेद्राबाद येथून जप्त केली आहे. वाहन मालक मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहे. (Akhara Balapur Police) आखाडा बाळापूर येथील गणपत शिंदे यांचे सराईत गुन्हेगार टोळीने अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागीतली होती सदर प्रकरणाचा एलसीबी, जिल्हा पोलीस पथकाने चौवीस तासात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनात छडा लाऊन सदर व्यवसायीकाची सुखरूप सुटका करत सहा आरोपी अटक करून दोन गावठी पिस्टल व इतर साहित्य जप्त केले होते आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मार्गदर्शनात आखाडा बाळापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते, शेख बाबरभाई, रामदास ग्यादलवाड, नागोराव बाभळे, प्रभाकर भोंग पथकाने प्रकरणात ज्या थार जीपमधून रेकी करून अपहरण करण्यात आले होते त्या वाहनांचा शोध लाउन तेलगांणा हैद्राबाद येथून आज सदर जीप तेलगांणा एम. जी. रोड पोलीस सहकार्याने (Akhara Balapur Police) बाळापूर पोलिसांनी जप्त केली असल्याचे सपोनी डी.बी.बसवंते यांनी सांगितले.

वाहन नंबर प्लेट बदलायचे आरोपी

हेद्राबाद येथून आरोपींनी सदर थार जीप भाड्याने घेतली होती. सदर वाहन महाराष्ट्रात आले किंवा इतर भागात गेले की तिकडचे नंबर प्लेट आरोपी लावत असत असे चौकशी दरम्यान समजले. आरोपी पोलीस कोठडी दरम्यान माहिती व (Akhara Balapur Police) स्थानिक पोलीस मदतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मार्गदर्शनात सपोनी डी.बी.बसवंते व पथकाने सदर वाहन शोध लावून जप्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article