अकोला (Akola Crime) : सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील न्यू तापडिया नगर, अकोला येथे दोन आरोपींनी फिर्यादीवर धारदार शस्त्र चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी बचाव पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत मुख्य न्यायदंडाधिकारी शीतल एस. बांगड यांच्या न्यायालयाने आरोपी शुभम पागृत याला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे. सोबतच पाच हजार रुपयांच्या दंडाचे प्रावधानदेखील केले आहे.
याप्रकरणी हकिकत अशाप्रकारे, गेल्या १८ डिसेंबर २०१६ रोजी आरोपी शुभम उर्फ गोलू रामकृष्ण पागृत व रामकृष्ण शालिग्राम पागृत दोघेही रा. खरप बु. यांनी फिर्यादी विक्की किशोर लिंगाडे रा. खरप बु. याला ’तू घरातील एका व्यक्तीकडे का पाहतोस’ म्हणून शिवीगाळ करत (Akola Crime) धारदार शस्त्र चाकूने डोक्यावर व मांडीवर वार करून न्यू तापडिया नगर, अकोला येथे गंभीर जखमी केले होते. त्यावरून फिर्यादी विक्की लिंगाडे याने सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
याच (Akola Crime) तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ३४ सह आयपीसी ४, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख यांनी करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या (Akola Crime) प्रकरणात न्यायालयाने बचाव पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी शुभम उर्फ गोलू रामकृष्ण पागृत (२१) रा. खरप बु. याला सदर गुन्ह्यांत दोषी ठरवून त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
एका आरोपीची निर्दोष मुक्तता
न्यायालयाने (Akola Crime) सदर प्रकरणातील दुसरे आरोपी रामकृष्ण शालिग्राम पागृत (४५) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ विद्या सोनटक्के यांनी मांडली. त्यांना सीएमएस सेल तथा पैरवी म्हणून पोलिस अंमलदार राजेश ठाकूर व सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनचे पोहेकॉ मयूर कमलाकर यांनी सहकार्य केले.