पंतप्रधान नरेंद्र माेदी. File Photo
Published on
:
04 Feb 2025, 12:11 pm
Updated on
:
04 Feb 2025, 12:11 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात, त्यांना संसदेत गरिबांचा उल्लेख कंटाळवाणा वाटेल. ज्यांना राहण्यास छत नाही त्यांनाच समजते की घर मिळण्याचे मूल्य काय आहे. विकास करुन दाखवायला हिंमत लागते. केंद्र सरकारने आतापर्यंत देशातील गरिबांना ४ कोटी घरे दिली आहेत. पूर्वी महिलांना शौचालय व्यवस्थेअभावी खूप त्रास सहन करावा लागला. ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांना पीडितांच्या समस्या समजू शकत नाही. आम्ही १२ कोटी पेक्षा अधिक शौचालये बांधली. ५ वर्षांत १२ कोटी घरात थेट पाणी पुरवठा केला. आम्ही देशातील जनतेला खरा विकास दिला, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. ते आज (दि. ४) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते.
"देशातील जनतेने मला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देण्याची १४ व्या वेळी संधी दिली आहे हे मी खूप भाग्यवान आहे. म्हणून, मी आदरपूर्वक जनतेचे आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले.
समस्या सोडविण्यासाठी समर्पित भावनेने काम करणे गरजेचे
समस्या सोडविण्यासाठी समर्पित भावनेने काम करणे गरजेचे आहे. आपण २०२५ मध्ये आहोत. एका अर्थाने, २१ व्या शतकाचा २५% भाग निघून गेला आहे. स्वातंत्र्यानंतर २० व्या शतकात आणि २१ व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षात काय घडले हे काळच ठरवेले परंतु जर आपण राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा बारकाईने अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की त्यांनी येणाऱ्या २५ वर्षांबद्दल आणि विकित भारताबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याबद्दल बोलले. त्यांचे भाषण नवीन आत्मविश्वास निर्माण करते आणि सामान्य लोकांना प्रेरणा देते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही जण गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात...
काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात, त्यांना संसदेत गरिबांचा उल्लेख कंटाळवाणा वाटेल. ज्यांना राहण्यास छत नाही त्यांनाच समजते की घर मिळण्याचे मूल्य काय आहे. ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांना पीडितांच्या समस्या समजू शकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना लगावला.
#WATCH | In a jibe to Lok Sabha LoP Rahul Gandhi, PM Narendra Modi says, "...Those who have photo sessions in the huts of the poor, for their own entertainment, will find the mention of the poor in Parliament boring." pic.twitter.com/YuB0TsqRos
— ANI (@ANI) February 4, 2025