महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Pudhari Photo
Published on
:
04 Feb 2025, 2:12 pm
विटा : पुढारी वृत्तसेवा : सन २००९ मधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माझ्या पराभवाच्या गोष्टी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पंच कमिटीने मान्य कराव्यात. अन्यथा आपल्या डबल महाराष्ट्र केसरीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार, अशी घोषणा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahara Patil) यांनी केली आहे. (Maharashtra Kesari Controversy)
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांच्या कथित वादग्रस्त निर्णयावरून सुरू झालेले वादंग अद्याप ही शमायचे नाव घ्यायला तयार नाही. पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे अशी थेट लढत झाली. ही लढत पै.पृथ्वीराज मोहोळ याने जिंकली. मात्र, सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचां ची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. आता या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. (Chandrahara Patil)
चंद्रहार पाटील यांनी काल सोमवारी या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवराज राक्षेने लाथ घातली, ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे धक्कादायक विधान केले. याबद्दल पुढे ते म्हणाले की, २००९ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपण तिसऱ्यांदा गदेचे दावेदार होतो. मात्र, तत्कालीन पंचांच्या अशाच चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी त्या वादग्रस्त निर्णयाला मी बळी पडलो होतो, त्यावेळी मी अगदी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असे सांगत आपल्याला ठरवून तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसेल, हे आता सिद्ध होत आहे.
अशा पध्दतीने कुस्ती स्पर्धामध्ये अनेक वर्षांपासून राजकारण होत आहे. त्याचा फटका पैलवानांना बसतो आहे. पै. शिवराज राक्षे हा सुद्धा तिसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकणार होता. मात्र, पंचांच्या एका निर्णयामुळे राक्षेंचे करियर खराब झाले. आता त्याच्यावर थेट तीन वर्षे बंदी घातली आहे, त्यामुळे तर त्याचे कुस्तीचे आयुष्यच संपणार आहे. त्यावर पुन्हा आणखी नवीनच वाद सुरू झाला. यावर पुन्हा आज (दि.४) पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपल्या २००९ च्या 'त्या' पराभवा बद्दल कुस्तीगीर कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य कराव्यात. अन्यथा मी माझ्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या कथा कुस्तीगीर परिषदेला परत करणार आहोत, अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली.
पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तत्कालिन उपाध्यक्ष पै. काका पवार आणि कुस्तीगीर संघाचा कार्या ध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांनी २००९ साली झाले ल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझ्यावर अन्याय झाला, अशी कबुली दिली आहे, त्यामुळे आपण जो आरोप केला होता. त्याला पुष्टीच मिळालेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्ती गीर परिषदेच्या पंच कमिटीने चुका मान्य कराव्यात. तसेच पै. शिवराज राक्षे वरील बंदी उठवावी, अन्यथा दोन वेळच्या महाराष्ट्र केसरी च्या गदा मी कुस्तीगीर परिषदेला ते सांगतील तेथे परत करणार आहे, असे ते म्हणाले.