दुकानांच्या तपासणीत गंभीर त्रुटी-
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी काढले आदेश
हिंगोली (Cheap Grain vendor) : सेनगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुट्या आढळुन आल्याने, तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्या बाबतचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी काढले आहे.
सेनगाव तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानदारामार्फत लाभार्थ्यांना (Cheap Grain vendor) स्वस्त धान्याचे योग्य पध्दतीने वाटप होत नसल्याबाबतच्या तक्रारी सेनगाव तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच काळाबाजारात जाणारे स्वस्त धान्य सेनगाव पोलीसांनी पकडुन गुन्हे दाखल केले होते. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी (Cheap Grain vendor) स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी करण्याच्या सुचना तहसील कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा भरात वसमत तहसीलदार शारदा दळवी, हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजंबळ, औंढा ना. तहसीलदार हरीश गाडे, कळमनुरीचे तहसीलदार जिवककुमार कांबळे आणि सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या पथकाने काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी देवुन पाहणी केली.
सेनगाव तहसीलदार मांडवगडे यांच्यासह पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान गोरेगावातील देवकीनंदन महिला बचत गट व महेश महिला बचत गटाद्वारे चालविल्या जाणार्या (Cheap Grain vendor) स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली असता, दोन्ही दुकानात धान्य पुरवठा व वाटपात तफावत आढळली. तसेच दुकान सिल केले असतानाही धान्याचे वाटप दिसुन आले. सदर दुकान महिला बचत गटाच्या नावे असताना पुरूष दुकान चालवित असल्याचे आढळुन आले. तसेच बामणी येथे ही धान्य पुरवठा व वाटपात तफावत आढळुन आली. त्यांचा अहवाल सेनगाव तहसीलदारांनी पाठविल्यावर तिन्ही दुकानाचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी निलंबीत केले आहेत.