बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात, काही चित्रपट हे त्यामध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्यांमुळे, अभिनेत्रींमुळे चर्चेत येतात. तर काही चित्रपट हे त्या चित्रपटाचं कथानक, सस्पेंस यामुळे चर्चेत राहातात. बॉलीवूडमध्ये अनेक हॉरर मुव्ही देखील बनवण्यात आले आहेत. हे भयपट देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. मात्र आज आपण अशा काही चित्रपटांची माहिती घेणार आहोत, जे चित्रपट प्रमाणाबाहेर बोल्ड असल्यामुळे त्यांच्यावर सेन्सर बोर्डाकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बोल्ड चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची चलती नव्हती त्या काळात हे बोल्ड चित्रपट तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्यातील सिन्सवर अक्षेप घेत सेन्सर बोर्डानं या चित्रपटांवर बंदी घातली. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल
बैंडिट क्वीन – हा चित्रपट डाकू फूलन देवीच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड दृश्य दाखवण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यानंतर अखेर दिल्ली हाय कोर्टाकडून या चित्रपटावर अस्थाई रुपात बंदी घालण्यात आली. चित्रपट कथेच्या ऑथेंटिकतेवरून देखील वाद निर्माण झाला होता.
फायर – फायर हा चित्रपट दोन महिलांचं भावविश्व उलगडणारा चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये नंदिता दास आणि शबाना आझमी या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या दोघींना पण त्यांच्या पतीनं सोडलेलं असतं. या दोन महिलांच्या नात्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं, या चित्रपटामध्ये देखील अनेक बोल्ड सीन्स असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
गांडू – 2010 ला या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती, या चित्रपटात असलेल्या बोर्ड सीन्समुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
कामसूत्र – सेक्शुअल कंटेनमुळे या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. सेन्सर बोर्डाने याबाबत निर्णय घेतला होता.
सिन्स – हा चित्रपट कॅथोलिक चर्चचे फादर आणि एक तरुणी रोजमेरी यांच्यामधील मैत्री आणि रिलेशनशिपवर आधारीत आहे, या चित्रपटामध्ये अनेक बोर्ड सीन्स असल्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
अन-फ्रीडम – हा चित्रपट देखील असाच आहे, यामध्ये देखील खूप सारे बोल्ड सीन्स होते. या चित्रपटामुळे हिंदू -मुस्लिम समाजामध्ये दंगली होऊ शकतात असं सेन्सर बोर्डाचं म्हणनं होतं त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.