अरविंद केजरीवाल यांच्यावर शाहबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.file photo
Published on
:
04 Feb 2025, 6:27 pm
Updated on
:
04 Feb 2025, 6:27 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपचे प्रमुख नेते व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात 'विष' मिसळल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्धात मंगळवारी (दि.४) शाहबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅडव्होकेट जगमोहन मनचंदा नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी एफआयआर दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.
२७ जानेवारीला एका निवडणूक रॅलीदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला मिळणाऱ्या दुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी केजरीवाल म्हणाले होते की, लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणे, यापेक्षा मोठे पाप नाही. भाजप आपल्या गलिच्छ राजकरणामुळे दिल्लीच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवत आहे. हरियाणातून दिल्लीला येणाऱ्या पाण्यामध्ये ते विष मिसळत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला होता. 'हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की, दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रांच्या मदतीने ते प्रक्रिया करता येत नाही, असेही ते यावेळी म्हणाले होते.