औंढा नागनाथ (Sri Nagnath temple) : भारतातील आठवे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या रथगृहातील श्री नागनाथाचा रथ आज 4 फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता मंदिर संस्थान सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर नागनाथ देवस्थानचे मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांच्या उपस्थितीत बाहेर काढून दिनांक 1 मार्च रोजी होणाऱ्या (Sri Nagnath temple) रथोत्सवाच्या पहिल्या फेरीची सुरुवात होणाऱ्या ठिकाणी रथ आणून लावण्यात आला आहे.
तत्पूर्वी मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक साहेबराव देशमुख, (Sri Nagnath temple) मंदिराचे गार्ड प्रमुख बबन सोनूणे, श्री दत्त मठाचे महंत शामगिरी जी महाराज, उत्तराधिकारी महंत राजेश गिरीजी महाराज, यांच्या हस्ते रथाची पूजा करून आरती करण्यात याप्रसंगी नवनाथ देशमुख, गार्ड जगदेव दिंडे, मुकेश पडोळे, भगवान शिंदे, माधव गोरे, गणेश जगताप, नामदेव पाटील, संजय मोरे, कृष्णा पाटील, नागेश माने, मंगेश शिरसागर, द्रुपद गोरे यांच्यासह इतर मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते.