फेसबुक मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीने Ray-Ban स्मार्ट ग्लासच्या विक्रीची माहिती दिली आहे. साल २०२४ मध्ये या आधुनिक अशा चष्म्याचे दहा लाखाहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. ही कंपनीसाठी मोठी सफलता आहे. कारण भारतासह अनेक रिजनमध्ये हे प्रोडक्ट अजून लाँच देखील झालेले नाही. मार्क झुकरबर्ग यांनी साल २०२५ साठी देखील टार्गेट ठरविले आहे. त्यांनी आपल्या स्टाफला विचारले की आपण २०२५ मध्ये ५० लाख युनिट्स विकू शकू का ? मार्क याने म्हटलंय की मला वाटते आमच्यासाठी एक प्रश्न हा देखील आहे की या वर्षी दहा लाखावरुन हा सेल २० लाखावर पोहचेल काय ? आपण दहा लाखाहून ५० लाखांवर पोहचू शकू काय ?
साल २०२३ मध्ये लाँच झाला होता
मेटा कंपनीने या स्मार्ट ग्लास म्हणजे चष्म्याला साल २०२३ मध्ये प्रथम लाँच केले होते. लाँच नंतर यात नवनवीन फिचर्स एड केले गेले आहेत. हा चष्मा मल्टी मॉडेल एआय सोबत येतात. जे तुम्ही काय पाहात आहात? काय ऐकत आहात ? सर्व काही प्रोसेस करतो. यात लाई्व्ह एआय ट्रान्सलेशनची सुविधा देखील आहे.
आम्ही कॅटगरीला इन्वेंट केले आहे. आमचा स्पर्धक अजून कोणी समोर आलेला नाही. कंपनी लवकरच या सग्मेंटमध्ये आपले नवीन प्रोडक्ट देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.कंपनी साल २०२५ मध्ये आपल्या नव्या स्मार्ट ग्साला लाँच करु शकते. ज्यात अनेक नवीन फिचर्स असणार आहेत असे मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
सध्य़ा भारतात मेटाचा हा सन ग्लास उपलब्घ नाही. आता कंपनी पुढील काळात नव्या रिजनमध्ये याची विक्री करू शकते. यात कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा तुमचे लाईव्ह व्हिडीओ तयार करु शकतो. शिवाय या चष्म्याला तुम्ही ब्ल्यू टुथशी कनेक्ट करुन कॉलींग आणि इतर दुसरी कामे करु शकता.