हिंगोली (Vasmat Gram Panchayat) : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळेमध्ये शासकीय महानेट प्रकल्पाचे इंटरनेट सुविधा वापर करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यावरून (Vasmat Gram Panchayat) वसमत तालुक्यात ५० ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
वसमत पंचायत (Vasmat Gram Panchayat) समिती अंतर्गत ग्रामपंचायतीचे शासकीय महानेट प्रकल्पाचे ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्यात वसमत तालुक्यातील गुंंज तर्फे आसेगाव, रुंज तर्फे आसेगाव, आसेगाव, राजापुर, बाभुळगाव, वाखारी, लहान, रेणकापुर, पिंपळा चौरे, जवळा तर्पेâ बाभुळगाव, इंजनगाव, नहाद, हापसापुर, टाकळगाव , मरलापुर, लोण बुद्रुक, मुडी, हिवरा खुर्द, भोरीपगाव, गणेशपुर, आरळ, करंजाळा, गुंडा, अकोली, लोळेश्वर, वडद, हिरडगाव, वाघी, धामणगाव, दगडगाव, म्हातरगाव, पोहणी खुर्द, रोडगा, मोहगाव, पुयणी बु, परळी या ५० गावामध्ये (Vasmat Gram Panchayat) ग्रामपंचायतीची इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी (Vasmat Gram Panchayat) वसमत पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना पत्राद्वारे सुचना दिल्या असून, ग्रामपचांयत अधिकार्यांना या सुविधांचा वापर करण्याबाबतच्या सुचना द्याव्यात असे ही पत्रामध्ये नमुद केले आहे.