सांगवीत मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून घरांवर पडली
Published on
:
04 Feb 2025, 2:28 pm
Updated on
:
04 Feb 2025, 2:28 pm
समुद्रवाणी : धाराशिव तालुक्यातील सांगवी गावात ११ केव्हीची मुख्य विद्युत वाहिनी तुटून काही घरांवर पडली. याचा सौम्य धक्का काही जणांना जाणवल्याने त्यांनी याची माहिती कामेगाव सबस्टेशन येथील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना दिली. महावितरणाने तातडीने विद्युत पुरवठा खंडीत केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर महावितरणाचे कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेत या विद्युत वाहिनीची तारेची जोडणी केली.