हिंगोली (Jaljivan Fund) : जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या (Jaljivan Fund) कामाच्या देयकासाठी निधी द्यावा, या मागणीसाठी कंत्राटदारांनी मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदमध्ये डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात जलजिवन मिशन (Jaljivan Fund) अंतर्गत ६१९ नळपाणी पुरवठा योजनेची कामे करण्यात येत असून जवळपास २०० कामे आतापर्यंत पुर्ण झालेली आहेत. परंतु मागील ५ ते ६ महिन्यापासुन या कामासाठी निधीच देण्यात आला नाही. एकीकडे योजनेची कामे पुर्ण करण्याकरीता कंत्राटदारांवर दबाव टाकला जात आहे. परंतु निधी नसतानाही ही कामे कशी पुर्ण करावीत असा प्रश्न कंत्राटदारांकडुन उपस्थित केला जात आहे.
सन २०२१-२२ मध्ये कामाचे आदेश निर्गमित केल्याने अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी युध्द पातळीवर कामे चालु केली. तसेच काही गावामध्ये या योजनेचे काम पुर्ण करून नळ पाणी पुरवठा (Jaljivan Fund) सुरळीत चालु झाला आहे. सदरील पुर्ण कामांना देयके अदा करण्यासाठी ८ महिन्यापासुन निधी उपलब्ध झाला नसल्याने कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत.
तसेच योजनेची अंदाजपत्रक बनवताना ज्या त्रयस्त कंपनीस विभागामार्फत सर्व्हे देण्यात आलेला होता. त्या (Jaljivan Fund) कंपनीनी चुकीचा सर्व्हे करून अंदाज पत्रक बनविलेली आहेत. त्यामुळे ६५० पैकी ३५० पेक्षा जास्त गावात सुधारीत अंदाजपत्रक बनविण्याची नामुषकी विभागावर आली आहे. जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी थकीत असलेला ३० कोटी रुपयांचा निधी तात्काळ द्यावा या मागणीसाठी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षासमोर डफडे बजाव आंदोलन केले.
दिलेल्या निवेदनावर संतोष घुगे, अविनाश पानपट्टे, संदिप पतंगे, सुरेश शेळके, अनंत गिरी, नामदेव कोरडे, विष्णु जगताप, ज्ञानेश्वर गरड, दिपक जैस्वाल, भागवत भोयर, मनोज माळोदे, गजानन नागरे, मोबीन महेबुब, सत्यनारायण बोखारे, संदिप सावंत, सचिन आरळ, के.पी.बुळे, केशव शांकट, पांडुरंग मुळे, सुजीत विडोळकर, अनिल पठाडे, अमोल घोडगे, सुधाकर गंगावणे आंदीच्या स्वाक्षर्या आहेत.