केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सकाळी विदर्भातून दिल्लीकडे तातडीने रवाना झाले. (File Photo)
Published on
:
17 Nov 2024, 7:19 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:19 am
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) रविवारी सकाळी विदर्भातून दिल्लीकडे तातडीने रवाना झाले. राज्यातील विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Polls) रणधुमाळीच्या दृष्टीने आजचा रविवार सुपर संडे मानला जात असताना अमित शहा यांचा दौरा रद्द झाला आहे.
गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर व इतर ठिकाणी असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभादेखील रद्द करण्यात आल्या. ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. मणिपूरमधील वाढता हिंसाचार व इतरही प्रशासकीय कारणांमुळे ते दिल्लीला तातडीने रवाना झाले असल्याचे समजते. आता सभांची तयारी झाली असल्याने काही ठिकाणी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण सभा घेणार आहेत.