विशेष तपास पथक (एसआयटी) समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती Pudhari News Network
Published on
:
05 Feb 2025, 4:29 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:29 am
मालेगाव : येथील तहसील व महापालिकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी व रोहिंग्यांना जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
त्यानंतर तपासासाठी शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. ही समिती या प्रकरणाचा तपास करीत आहे. बनावट जन्म प्रमाणपत्राबाबत माहिती किंवा कागदपत्रे सादर करावयाची असल्यास संबंधितांनी समिती कार्यालयात सादर करावीत असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
येथील तहसील कार्यालय, मनपाकडून बनावट जन्म प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. बनावट जन्म प्रमाणपत्रांची काही माहिती किंवा काही कागदपत्रे समितीस सादर करावयाचे असल्यास नागरिकांनी बुधवारी (दि. 5) दुपारी 1 ते 3 या वेळेत समिती कार्यालयात सादर करावीत. कॅम्प पोलिस ठाणे येथील समिती कार्यालयात वरील वेळेत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.