Published on
:
05 Feb 2025, 6:26 am
Updated on
:
05 Feb 2025, 6:26 am
पिंपळनेर, जि.धुळे | साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शेलबारी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी वनरक्षक आकार पावरा यांना दूरध्वनीद्वारे दिघावे बिटचे मेजर वनरक्षक अनिल घरटे यांना माहिती दिली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकारी भगवान गीते यांच्या आदेशाने वनरक्षक मेजर अनिल घरटे व वनरक्षक आकार पावरा यांनी शेलबारी घाटात मृत पावलेल्या तरसाचा पंचनामा करुन पिंपळनेर येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. यावेळी पिंपळनेर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी एस गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात सदर मृत पावलेल्या तरसास जाळण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बीएसगीते, वनपाल आर व्ही चौरे, वनरक्षक मेजर अनिल घरटे, वनरक्षक सवीता ठाकरे, वनरक्षक आकाश पावरा, वनरक्षक रंजना पावरा, वनमजुर बाजिराव पवार, मोहनदास शिंदे, बबलू कुवर, उज्जैन चौधरी यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एम व्ही हेमाडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. परिसरात वन्यप्राण्यांच्या वावर वाढत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांनी खबरदारी घ्यावी व सदर असे वन्यप्राणी आढळल्यास अथवा दिसल्यास वनपरीक्षेत्र पिंपळनेर कार्यालयास माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.