आजकाल सर्वांनाच सिल्की आणि चमकदार केस हवे असतात. परंतु, व्यस्त जीवनशैलीमुळे, खाण्या पिण्याच्या वाईट सवयींमुळे आणि कामाच्या ताणामुळे मुलांचे केस कमी वयातच गळू लागतात. बऱ्याचदा वयाच्या ३० व्या वर्षी अनेकांना टक्कल पडू लागते. अशा परिस्थितीत केस गळल्यामुळे ती व्यक्ती वयस्कर दिसू लागते. त्यासोबतच निरोगी गोष्टी नाही खाल्ल्यामुळे तुम्हाला केसगळती आणि केसामध्ये कोंड्याच्या समस्या उद्भवतात. तुमच्या टाळूवर ड्राय स्कॅल्प कोंड्याच्या समस्या होतात. तुमच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा नाही झाल्यामुळे तुम्हाला कोंडा आणि केसगळतीच्या समस्या उद्भवू शकतात.
डोक्यावर हेअर पॅच लावणे अधिक फायदेशीर ठरू शकते म्हणून बहुतेक लोक हा पर्याय निवडतात. केसांवर पॅच लावणे सोपे आहे, परंतु ते व्यवस्थापित करणे खूप कठीण आहे. डोक्यावर हेअर पॅच लावल्यामुळे तुमच्या स्कॅल्पला ईजा होण्याची शक्यता आहे. हेअर पॅच लावल्यावर विशेष काळजी घेतली पाहिजेल. चला तर जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्यामुळे केसांची काळजी घेणे फायदेशीर ठरेल ज्यामुळे तो हेअर पॅच दीर्घकाळ टिकेल.
जर तुमच्या डोक्यावर हेअरपॅच असेल तर त्यांना नियमितपणे स्वच्छ करा. हेअर पॅच स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सौम्य शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करू शकता. हेअर पॅच दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही सलूनमधून किंवा ज्या डॉक्टरांकडून तुम्ही हेअर पॅच लावला आहे त्यांच्या सल्ल्यानुसार शॅम्पू किंवा कंडिशनर वापरू शकता. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की ते खऱ्या केसांसारखे केसांचा पॅच वापरू शकतात, परंतु तसे नाही. हेअर पॅचवर उष्णता-आधारित स्टाइलिंग टूल्सचा वापर कमीत कमी करा कारण यामुळे हेअर पॅचमधील केसांचे नुकसान होऊ शकते. जर स्टाईलिंग आवश्यक असेल तर उष्णता संरक्षणात्मक स्प्रे वापरा. केसांचा पॅच चांगल्या स्थितीत राहण्यासाठी तुमच्या तज्ञांकडून नियमितपणे तपासणी करून घ्या.
हे सुद्धा वाचा
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर हेअर पॅच काढत असाल तर त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही पॅचचे आयुष्य वाढवण्यासाठी साटन किंवा रेशमी उशाचा कव्हर वापरू शकता.हेअर स्प्रे, जेल किंवा इतर स्टायलिंग उत्पादनांचा वापर मर्यादित करा कारण ते तुमच्या केसांमध्ये अवशेष सोडू शकतात. ज्यामुळे टाळूवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यसोबतच या हेअर पॅचवर तेल लावणे टाळा यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.