अकोला (Apartment fire) : रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील अग्रसेन चौक परिसरातील गंगाधर प्लॉट येथे मंगळवार, ४ फेब्रुवारीला ९.१५ मिनिटांनी आरती अपार्टमेन्ट बेसमेन्टमधील प्रमिंग साहित्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीमध्ये सुमारे दहा ते बारा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सदर अपार्टमेन्टमधील सदनिकेतील बारा कुटुंबीयांना ‘रेस्क्यू’ ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात महापालिका प्रशासनाला यश आले.
या (Apartment fire) आगीवर मनपाच्या अग्निशमन विभागाव्दारे आठ ते नऊ फायर टेंडरव्दारे नियंत्रण आणण्यात आले. तसेच वरच्या मजल्यावरील सिलिंडर ‘रेस्क्यू’ करून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही दुचाकी वाहने तसेच प्रमिंगचे साहित्य जळाले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी वरच्या मजल्यावर आग पोहोचली नव्हती. मात्र, धुराचे लोट वरच्या मजल्यावर जात होते.
त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी तेथील नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वरच्या मजल्यावरील आठ नागरिकांना ‘रेस्क्यू’ केले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन भीषण लागलेल्या (Apartment fire) आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर नागरिकांना या आगीतून ‘रेस्क्यू’ ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात यश आले. यावेळी अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख मनीष कथले, वाहनचालक श्रीकृष्ण गाडगे, अनिल जगताप, प्रमोद इंगळे, फायर मॅन प्रकाश बनकर, प्रेम तायडे, भूषण ठोसर, दिनेश ठाकूर, स्वराज बल्लाळ, उमेश भिरड यांनी आग आटोक्यात आणली.
एसपी, एसडीपीओ, मनपा आयुक्तांची धाव
शहरातील गंगाधर प्लॉट येथे अपार्टमेन्टच्या बेसमेन्टमधील प्रâेमिंग साहित्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या (Apartment fire) आगाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
ऑटोचालकाने वाचविले आईसह दोन चिमुकलीचे प्राण
मोठ्या उमरीतील ऑटोचालक भाष्कर अंजनकर हे गंगाधर प्लॉटमध्ये प्रवासीभाडे सोडायला गेले होते. त्यांना (Apartment fire) भीषण आग लागल्याचे दिसले. यावेळी अग्निशमन विभागाच्या वाहनावर असलेल्या सिडीवर चढून त्यांनी आईसह दोन चिमुकल्या मुलींना जीव धोक्यात घालून बाहेर काढले.
आगीचे लोट, धुरामुळे रहिवाशांमध्ये भीती
या ठिकाणी भीषण आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोट व धुरामुळे रहिवाशांच्या मनात भीती पसरली होती. ही (Apartment fire) भीषण आग संपूर्ण अपार्टमेन्टला कवेत घेते की काय, अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. परंतु, मनपाच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हे आलेत देवदूतसारखे धावून
प्रशासकीय यंत्रणेतील महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी, समाजसेवक, स्थानिक रहिवासी, काही सामाजिक कार्यकर्ते व वाहनधारकांनी त्यांची कामे बाजूला सारून आरती अपार्टमेन्टमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी देवदूतासारखे धावून आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
आग (Apartment fire) लागल्याचे कळताच रुग्णसेवक नितीन सपकाळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता अॅम्ब्युलन्ससह घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता इमारतीमध्ये अडकलेल्या लहान-मोठ्या ८ ते ९ जीवांना त्यांनी आगीमधून सुरक्षित बाहेर काढले. अॅम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांनी केलेली धडपड वाखाणण्याजोगी होती, आग पूर्णत: काबूत येईपर्यंत त्यांनी घटनास्थळ सोडले नाही. तसेच रुग्णालयात दाखल केलेल्यांवर तत्काळ उपचारही करवून घेतले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.