अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अनेक चर्चंना उधान आलं होतं. या दोघांसोबत त्यांच्या कुटुंबातील वादावरील बातम्याही पसरल्या होत्या. एवढच नाही तर ऐश्वर्याने आपल्या नावातून ‘बच्चन’ आडनाव काढून टाकल्यानंतर या अफवांना आणखीनच जोर चढला होता. इतकेच नाही तर, अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निम्रत कौरचे नावही जोडले जाऊ लागले होते. मात्र यावर बच्चन कुटुंब, किंवा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर, या सर्व अफवांना पूर्णविराम देत या दोघांनी एकत्र येत या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले. अनेकदा हे कपल पुन्हा एकत्र दिसत असल्यानं या चर्चां थांबल्या गेल्या.
“आम्हाला खूप काही जुळवून घ्यावं लागतं…”
दरम्यान आज, 5 फेब्रुवारीला अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे. या अफवा पसरण्याआधी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या हे कायमच एकमेकांबद्दल भरभरून बोलत आले आहे. अनेक मुलाखतींमध्ये या दोघांनी एकमेकांबद्दच्या नात्यावर चर्चा केली आहे. अशाच एका मुलाखतीत ऐश्वर्या त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला तिच्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दल विचाण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली होती की, “आम्हाला खूप काही जुळवून घ्यावं लागतं. दोन्ही बाजूंकडून कधी एकमक असतं, तर कधी असहमतीही असते. इथे दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि व्यक्तिमत्व आहे त्यामुळे होकार-नकार हे सुरुच राहणार. पण काहीही झाले तरी संवाद तुटला नाही पाहिजे. यावर माझा विश्वास आहे.”
“नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो…”
ऐश्वर्या पुढे म्हणाली, ” नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. अभिषेकने या गोष्टीचा नेहमीच आदर केला आहे. मी अशा लोकांपैकी नाही जे म्हणतात की ठीक आहे आजसाठी हे संपवू. हे उद्यापर्यंत पुढे नेले नाही पाहिजे. पण तसं नसतं तुम्हाला तुमच्या नात्यासाठी दररोज वेळ द्यावाच लागतो. या सर्वांचा अर्थ आदर आहे. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचा नेहमी आदर केला पाहिजे. तसेच त्याच्यासाठी भावनिक देखील असलं पाहिजे. त्याशिवाय हे नात टिकणार कसं?” असं म्हणत तिने तेही इतरांप्रमाणे परफेक्ट कपल नसून एकमेकांना समजून घेण्याचाच प्रयत्न करत असल्याचं तिने म्हटलं होतं.
म्हणून कदाचित त्यांचं लग्न मोडता मोडता वाचलं
या मुलाखतीत तिने मांडलेल्या त्यांच्या नात्यातील सत्य परिस्थिती स्विकारल्यामुळे त्यांच्यात वाद-भांडण असे प्रसंग येऊ शकतात याची कल्पना या दोघांनाही नक्कीच होती. पण मुलाखतीत तिने मांडलेल्या तिच्या विचारांमुळे किंवा त्यांच्यात ठरलेल्या काही गोष्टींमुळे त्यांच्यात पटत नसलं तरीही किंवा पसरलेल्या अफवांप्रमाणे त्यांनी वेगळं होण्याचा मार्ग निवडण्याचं ठरवलं होतं तरीही.
अभिषेक आणि ऐश्वर्याचं नात आता हळूहळू पूर्ववत येण्यासाठी सज्ज आहे असं दिसून येतंय. ऐश्वर्याने सांगितलेल्या विचारांमुळे हे दोघेही घटस्फोटासारखा निर्णय घेऊ शकणार नाही हीच बाजू समोर येत आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं नात, त्यांचं लग्न मोडता मोडता वाचलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगद्वारे भावना व्यक्त केल्या होत्या
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे अमिताभ बच्चन त्रस्त झाले होते. अखेर त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक मोठी पोस्ट लिहिली होती. बिग बी यांनी लिहिलं होतं की, “वेगळे होण्यासाठी आणि आयुष्यात त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यासाठी खूप धैर्य, विश्वास आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. मी माझ्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण मला ते खासगी ठेवायला आवडतं. अफवा फक्त अफवा असतात, त्या पुराव्याशिवाय रचलेल्या खोट्या गोष्टी असतात.” असं म्हणत त्यांनी या चर्चांना थांबवण्याचं आवाहन केलं होतं.